कॅरेट (karat) म्हणजे नक्की काय?
सोन्याची शुद्धता आणि शुद्धतेचे प्रकार-
आयुष्यतील प्रत्येक मंगलमयी प्रसंगी किंवा प्रत्येक शुभ मुहूर्त हा सोने खरेदी शिवाय अपूर्ण च असतो. आपल्या आयुष्यात सोन्याची ओळख हि अगदी लहानपणा पासून च होते,लहान बाळाला आपण सर्व प्रथम सोन्याचे दागिने घालतो तर आपल्या लाडक्या लेकी ला तिच्या नवीन आयुष्याची भेट म्हणून देखील सोनेच भेट करतो .आपल्या आयुष्यात सोने खरेदी करण्याच्या प्रसंग हा नक्क्की च येतो , प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आयुष्यात कधी ना कधीतरी सोने खरेदी करत असतो. गुंतवणूक असो किंवा कोणताही शुभ मुहूर्त आपण सोन्याला नेहमी च प्राधान्य देतो पण आपणं खरेदी करत असलेल्या सोनीबद्दल आपणांस संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे
सोने खरेदी करायला जातो, तेव्हा दुकानदार आपल्याला विचारणारा हमखास प्रश्न म्हणजे किती कॅरेटचे सोने हवे आहे. पण नक्की 24 कॅरेट, 22 कॅरेट की 18 कॅरेट.हे नक्की काय आहे ? 24 आणि 22 कॅरेट काय आहेत आणि या दोघांमध्ये काय फरक आहे? तर जाणून घेउयात सोन्याच्या शुद्धतेबद्दल अधिक माहिती सोने खरेदी करायला जातो तेव्हा आपण प्रथम आपल्या आजूबाजूच्या परिसरातील Best jewellers सर्च करून पाहतो, पण त्यासोबत आपण इतर देखील माहिती लक्षात घ्यायला हवी ,त्याबाबत अधिक माहित जाणून घेऊयात.
सोन्याच्या कॅरेटवरून सोन्याची ची शुद्धता कळते . सोन्याचे दागिने जितके अधिक कॅरेट चे तितके त्याची शुद्धता अधिक असते . 24 कॅरेट सोने हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप मानले जाते. जर तुम्ही एखादा नवीन दागिना घेत असाल तर तुमच्या जीवनशैली आणि बजेट लक्षात घेऊन सर्वोत्तम निर्णय घेऊन खात्रीशीर दागिने खरेदी करण्यासाठी सोन्यामधील फरकांबद्दल थोडे जाणून घेणे उपयुक्त ठरेल.
कॅरेट (karat) म्हणजे?
कॅरेट (karat) म्हणजे सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे..भारत सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट असे कॅरेटचे प्रकार आहेत आणि या चार कॅरेट मध्येच आपल्याला सोन्याचे दागिने मिळतात. सोन्याच्या दागिने असो व एवढी भेट वस्तू , कॅरेट जितके जास्त तितके सोने शुद्ध असते. प्रत्येक कॅरेटला एक हॉलमार्क नंबर दिलेला असतो आणि ह्या हॉलमार्क वरून आपल्याला कळते कि आपण खरेदी केली सोन्याचे शुद्धता किती टक्य्यांमध्ये आहे .
24 कॅरेट सोने :
24 कॅरेट – 24 k सोने व त्यापासून बनवलेले दागिने हे शुद्ध सोने मानले जाते. 24 k सोन्याचा दागिन्यांमध्ये 99.9 टक्के सोने वापरले जाते. 24 k सोन्याचा दागिन्यांमध्ये इतर कोणत्याही धातूंचे मिश्रण नसते.. हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप असल्याने, ते इतर कॅरेट पेक्षा अधिक महाग असते.परंतु सोने हा लवचिक धातू आहे म्हणून २४k सोने हे दागिन्यांसाठी वापरण्यापेक्षा नाणी व बनव्यासाठी वापरतात
22 कॅरेट सोने :–
22k सोने हे 91.6 टक्के शुद्ध सोने असून उर्वरित चांदी, जस्त, निकेल व इतर धातूंचा दागिण्यानुसार समावेश असतो .बहुतांश सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेटच सोने वापरले जाते.चांदी, जस्त, निकेल व इतर धातूंचासमावेश केला जातो. नाजूक आणि रेखीव दागिन्यांची विस्तृत श्रेणी बनवायची असेल तर हे सोने वापरले जाते .
18 कॅरेट सोने :
18 कॅरेट – 18k च्या सोन्या मध्ये 75 टक्के शुद्ध सोन्याचा समावेश असून तांबे , झिंक, निकेल, चांदी ह्या सारख्या इतर धातूंचा समावेश असतो. इतर धातूंच्या वापरामुळे मूळ सोन्याची लवचिकता कमी होऊन दागिन्यांची कठोरता वाढते म्हणूनच हिऱ्याचे दागिने बनवण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करणे अत्यंत योग्य समजले जाते .तुम्ही 18k सोने त्याच्या तेजस्वी, पिवळ्या रंगावरून ओळखू शकता. हे सामान्यतः अंगठी, हार आणि इतर प्रकारच्या लोकप्रिय दागिने बनवण्यासाठी वापरले जाते . संतुलित शुद्धतेमुळे तसेच इतर धातूंचा समावेश असल्यामुळे 18 कॅरेट सोने हे सर्व प्रकारचे दागिने बनवण्यासाठी प्राध्यान्य दिले जाणारे सोने आहे. . 24 कॅरेट आणि 22 कॅरेट च्या तुलनेत पाहायला गेले तर 18 कॅरेट सोने स्वस्त आहे व परवडण्यासारखे आहे. दैनंदिन वापरासाठी 18 कॅरेट सोन्या पासून बनवलेले दागिने .18 k पासून बनलेल्या दागिन्यांना प्राध्यान्य देण्यामागचे अजून एक कारण म्हणजे , हे दागिने परिधान केल्यावर खराब होण्याची शक्यता कमी असते.
14 कॅरेट सोने :
14 कॅरेट – 14 k सोन्यामध्ये 58.3 टक्के शुद्ध सोने वापरलेले असते व बाकी चे इतर धातूंचे मिश्रण केलेले असते. सोनीच्या कमी प्रमाणात केलेल्या वापर मुळे 14 कॅरेट दागिन्यांची किंमत इतर कॅरेट पेक्षा बऱ्यापैकी कमी असते. यात इतर धातूंचे प्रमाण जास्त असल्याने ते अधिक बळकट व टिकाऊ असते. त्यामुळे रोज वापरण्यासाठी 14 कॅरेटचे सोन्याचे दागिने घ्यावे आणि त्याच्या बळकट पणामुळे त्याला जास्त पसंती दिली जाते.
सोन्याच्या शुद्धतेचे हे प्रकार असले तरीही कोणत्या कॅरेट चे सोने वापरायचे हे पूर्णपणे आपल्यावर आहे. आपलं बजेट आणि कोणत्या प्रसंगी आपण सोने खरेदी करतोय हे आपण लक्षात घायला हवे. जर आपण सोने हे गुंतवणूक म्हणून घेणार असु तर २४k हा उत्तम पर्याय आहे . तसेच पूर्ण शुद्ध असल्यामुळे हि एक योग्य गुंतवणूक ठरू शकते. दागिने खरेदी करते वेळी त्यांचे नाविण्य आणि कल्पकता ह्या गोष्टींना आपण प्रथम प्राधान्य देतोच पण सोन्याची शुद्धता हा देखील महत्वचा मुद्दा आहे. दागिन्यांसाठी सोन्याचा योग्य प्रकार निवडणे ही काही सोपी गोष्ट नाही, पण हि माहिती आणि हेमंत ज्वेलर्समधील अनुभवी कर्मचार्यांच्या मदतीमुळे तुम्हाला योग्य निवड करता येईल.ज्यामुळे तुम्ही योग्य आणि उत्तम दागिने खरेदी करू शकाल .
दागिन्यांची शुद्धता आणि विश्वासहर्ता हि ओळख असलेले एकमेव सुवर्णदालन म्हणजे “हेमंत ज्वेलर्स, वाकड “.अद्वितीय दागिन्यांच्या मनमोहक डिसाईन्स आणि नाजूक कलाकुसर असलेले दागिने तसेच प्रत्येक सण समारंभासाठी विशेष दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंत असलेले एकमेव सुवर्णदालन .याच बरोबर आमच्याकडे Latest Mangalsutra Designs चे खूप सारे प्रकार पाहण्यास मिळतील .पारंपरिक दागिन्यांपासून ते तुमच्या दैनंदिन आयुष्यात वापरण्यासाठीचे अनेक प्रकारचे दागिने तुम्हाला आमच्या इथे नक्की खरेदी करता येईल आमच्याकडे प्रत्येक प्रसंगासाठी दागिन्यांच्या कलेक्शनची विस्तृत श्रेणी आहे. दैनंदिन वापरण्यासाठी Gold plated Design ते हि Best Prices मिळण्याचे वाकड मधील उत्तम ज्वेलरी शॉप म्हणजेच हेमंत ज्वेलर्स
आमची वेबसाईट- jewellershemant@gmail.com
पत्ता-हेमंत ज्वेलर्स, उत्कर्ष चौक, वाकड, पुणे – ४१११०५७